राऊत-केसरकर जुंपली! पाच जागांच्या टीकेवर केसरकर म्हणाले, संजय राऊत स्वतःच कन्फ्यूज

राऊत-केसरकर जुंपली! पाच जागांच्या टीकेवर केसरकर म्हणाले, संजय राऊत स्वतःच कन्फ्यूज

Deepak Kesarkar on Sanjay Raut : देशात आणि राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकांसाठी जागावाटप कसे होणार असा प्रश्न आहे. भाजपकडे (BJP) गेलेल्या शिंदे गटाला पाच जागा जरी मिळाल्या तरी खूप आहेत असा खोचक टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला होता. त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

केसरकर आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर केसरकर म्हणाले, संजय राऊत बोलतात त्यावर फार बोलणं योग्य नाही. त्यातून लोक आणखी कन्फ्यूज होतील. ते स्वतःच कन्फ्यूज असतात ते काय बोलतात याबद्दल काही माहिती नसते यावर संशोधन करणे गरजेचे आहे, असा टोला केसरकर यांनी लगावला.

‘मी महाराष्ट्रातच बरा पण, लोकसभेची जबाबदारी दिली तर’.. केसरकरांनी टाकली गुगली

शिंदे गट आणि भाजपात जागावाटपाबाबत चर्चा झाली असून शिंदे गटाने भाजपकडे लोकसभेच्या 22 जागा मागितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतक्या जागा देण्यास राजी नसल्याचेही समजते. त्यामुळे दोघात वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच संजय राऊत यांनी या वादाला हवा दिली आहे. राऊत यांनी शिंदे गटाला पाच जागा जरी मिळाल्या तरी खूप आहेत असा टोला लगावला.

जागावाटपाचे अजून काही ठरलेले नाही मात्र राजकीय पक्षांकडून प्राथमिक पातळीवर चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत.  काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यावर आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले होते.

Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याने विखे पाटील-शिंदेंच्या नात्यात ‘समृद्धी’ येणार?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube