पुणे : विद्येचे माहेर घर असलेलया पुण्यातून क्रूरतेलाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून पतीने साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर हत्या (Murder) करणारा पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, खराडी परिसरात ही अंगावर शहारा आणणारी घटना घडली आहे. काही दिवासांपूर्वी विमान नगर परिसरातील एका कंपनीत तरूणाने तिच्या मैत्रिणीवर भर रस्त्यात सपासप वार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर आता या परिसरात पतीने त्याच्या पत्नीची हत्या करून व्हिडिओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे.ज्योती शिवदास गीते असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून शिवदास तुकाराम गिते असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. (Husband Killed His Wife In Pune Kharadi Area)
आगीची अफवा पळापळ अन् जीव वाचण्यासाठी उड्या; पुष्पकच्या अपघाताने मुंबईतील ‘तो’ अपघात चर्चेत
खून करून बनवला व्हिडिओ
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने अंदाजे साडेतीन मिनीटांचा व्हिडिओ बनवला आहे. यात तो तू लक्ष्मी होती.मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती, तिला मारावं किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मारावं लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत, असं आरोपी शिवदास गिते व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
आरोपी पती मुळचा बीडचा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला आहे. माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीचा खून केला. पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे.
शुभदाचा खून एकट्या कृष्णाने नाही, 100 बघ्यांनीही केलाय!
कंपनीच्या आवारात तरूणीची हत्या
काही दिवसांपूर्वीच विमान नगर परिसरात असलेल्या कंपनीच्या आवारात मित्राने त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरूणीवर कोयत्याने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या परिसरातील खराडी परिसरात पतीने पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने खून करत त्याचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.