IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Arrest from Mahad : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या प्रकरणामध्ये एका मागोमाग एक अपडेट समोर येत आहेत. त्यात आता पुजा यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar ) यांना महाडमधून अटक करण्यात आली आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये त्या लपून बसल्या होत्या. त्यानंतर आता स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस त्यांना पुण्याला घेऊन येत आहे.
ऐन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना; पोस्ट करत म्हणाले मी पुन्हा येईन…
शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांचा हा शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत होते. तर आता अटक करून त्यांना पुण्यात आल्यानंतर त्यांच्या अटके संदर्भातील कारवाई पूर्ण केली जाणार आहे.
Manorama Khedkar, mother of controversial IAS probationer Puja Khedkar, detained in alleged land dispute case: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2024
खाजगी क्षेत्रातील आरक्षण विधेयकाला स्थगिती; प्रचंड विरोधानंतर कर्नाटक सरकारचा यु टर्न!
तसेच लगेचच त्यांची चौकशी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका या गावातील जमीन या खेडकर कुटुंबियांनी विकत घेतली होती. ही जमीन पूजा खेडकर यांच्याच नावावर होती. मात्र त्याची पॉवर ऑफ एटर्नी मनोरमा यांच्या नावावर होती. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आसपासच्या परिसरातील जमीन असलेल्या एका शेतकऱ्याला थेट हातामध्ये पिस्तूल घेत धमकावल्याचा समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता मनोरमा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.