Download App

कार्यालयाचे उद्घाटन अजितदादांकडून वेळेच्या आधीच; भाजपच्या मेधा कुलकर्णी चिडल्या, मग दादांनीच तोडगा काढला

Medha Kulkarni : . वेळेच्या आधी दहा मिनिटे उद्घाटन झाले आहे. त्याचे नक्कीच मला वाईट वाटते. माजी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar and Medha Kulkarni : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे वेळेचे पक्के आहेत. कुठेलही उद्घाटन असो की बैठक ते वेळेतच हजर असतात. तरी कधीही वेळेपूर्वीच दाखल होऊन उद्घाटन करतात. पण पुण्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या (Parshuram mahamandal) नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी सकाळी साडेसहा वाजता होते. परंतु अजित पवार यांनी नवीन इमारतीचे उद्घाटन भाजपच्या नेत्या व राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी ( Medha Kulkarni) या येण्याच्या आधीच सहा मिनिटे केले. त्यावरून मेधा कुलकर्णी या चिडल्या होत्या. त्यांनी नाराजी व्यक्ती. त्यावर अजितदादांनी तोडगा काढत मेधा कुलकर्णी यांच्याबरोबर पुन्हा इमारतीचे उद्घाटन केले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली, अर्थव्यवस्था सुधारण्याची घेतली शपथ

या महामंडळाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्राला जागं करण्यासाठी येताहेत…पुन्हा शिवाजीराजे भोसले! सिद्धार्थ बोडके साकारणार मुख्य भूमिका

वेळेच्या आधी उद्घाटन झाल्याबद्दल खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेच्या आधी दहा मिनिटे उद्घाटन झाले आहे. त्याचे नक्कीच मला वाईट वाटते. माजी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होते तिथे सगळेच येणार होते. बस किंवा फ्लाईट आपण ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच ना, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये. मी आधी दहा मिनिटापूर्वी आले होते. दादा यांनी वीस मिनिटापूर्वीच उद्घाटन केले.


दादांनी वेळेच्या आधी उद्घाटन करू नये

पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल. आमचे तिन्ही नेते जास्त जास्त काम करतात ते आमचे आदर्श आहेत. दादा यांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करू नये एवढीच विनंती आहे.

follow us