Download App

ठरलं! इंडिया आघाडीचा महामेळावा ‘या’ दिवशी पुण्यात होणार, शरद पवार गटाच्या बैठकीत निर्णय

  • Written By: Last Updated:

India Alliance Upcoming Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) घोषणेला आता अवघे दोन महिने राहिलेले आहेत. असं असतांनाच दिवसेंदिवस इंडिया आघाडीला (India Alliance) मोठे धक्के बसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितीश कुमार एनडीएमध्ये गेले. याशिवाय, राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये (BJP) दाखल होत आहे. त्यामुळंच आता इंडिया आघाडी पुन्हा खडबडून जागी झाली. इंडिया आघाडीची पुढची बैठक पुण्यात होणार असल्याची माहिती आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात एक बैठक झाली, त्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

‘निष्ठावंत मेधाताईंच्या उमेदवारीचं स्वागत’; उमेदवारी जाहीर होताच देवधरांची पहिली प्रतिक्रिया 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांच्या निकालानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ६ डिसेंबर रोजी ‘इंडिया’ आघाडीची बैठक आयोजित केली होती. मात्र, ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी बैठकीला येणे टाळले होते. दरम्यान, आता ही बैठक पुण्यात होणार आहे. येत्या २४ फेब्रवारीला इंडिया आघाडीचा मेळावा पुण्यात होणार आहे.

नांदेड शहर कॉंग्रेस कमिटीची कार्यकारणी बरखास्त, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर 

याबाबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हासह आगामी लोकसभा निवडणूका लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकार व कार्यकरर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणूक इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात २४ फेब्रवारी २०२४ रोजी इंडिया आघाडीची मेळावे पुणे शहरात संपन्न होणार आहे. इंडिया आघाडीतल सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार आहेत. शिरूर, बारामती, पुणे या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचं चव्हाण म्हणाले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत समान किमान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पवार नावाची भीती वाटत असल्यानं…
राष्ट्रवादीचे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आज माध्यमांत झळकल्या.याबाबत प्रशांत जगताप यांनीही ही बातमी साफ चुकीची असल्याचं म्हटलं आहे. पवार नावाची भीती वाटत असल्यानं अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा पलटवार जगताप यांनी केला.

 

follow us