Download App

भारताचे अल्युमिनियम कास्टिंग क्षेत्र जागतिक स्तरावर पोहोचतेय : भरत गीते

Bharat Gite: आम्ही आधुनिक जर्मन तंत्रज्ञान आणि भारतीय नवकल्पना एकत्र करून वर्ल्ड क्लास सोल्यूशन्स भारतात तयार केली आहेत.

  • Written By: Last Updated:

पुणे : जपानमध्ये सुरू असलेल्या प्रमुख तंत्रज्ञान प्रदर्शनात “तौरल इंडिया” (Taural India)ने पहिल्याच दिवशी जगभरातील अनेक नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. झिंबाब्वेचे उपराष्ट्रपती केम्बो मोहाडी यांन स्टॉलला भेट देऊन चर्चा केली. या भेटीत त्यांनी नो-बेक सँड फौंड्री व मेल्टिंग प्रोसेस बाबत विशेष रस दाखवला. त्यांना सविस्तर माहिती देताना, तौरल इंडिया” च्या ओळखीचे प्रतीक म्हणून “अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया” ची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आल्याचे उद्योजक भरत गिते (Bharat Gite)यांनी सांगितले.

उपराष्ट्रपतींनी उत्पादनांचे कौतुक करताना आश्चर्य व्यक्त केले. ही उत्पादने जर्मन इंजिनिअरिंगपेक्षाही अधिक उत्कृष्ट आहेत. विशेषतः डिफेन्स, मरीन अप्लिकेशन्स व रोबोटिक आर्म क्षेत्रात त्यांनी विशेष रुची दाखवली. (India’s aluminum casting sector is reaching global level: Bharat Gite)

तसेच भरत गीते म्हणाले, आम्ही आधुनिक जर्मन तंत्रज्ञान आणि भारतीय नवकल्पना एकत्र करून वर्ल्ड क्लास सोल्यूशन्स भारतात तयार केली आहेत. हा अनुभव “तौरल इंडिया” ला भारतातील अल्युमिनियम कास्टिंग उद्योगाचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पुढे नेत आहे. यापूर्वी टोनीनो लॅम्बॉर्गिनी यांच्यासारख्या जागतिक सहकाऱ्यांनी देखील आमच्या उत्पादनांचे कौतुक केले होते.

भारतीय अभियांत्रिकी क्षमता जेव्हा जागतिक सर्वोत्तम पद्धतींसोबत एकत्र येते. तेव्हा ती कुठेही टिकू शकते. आज त्या क्षमतेचे प्रदर्शन होत आहे आणि ‘तौरल इंडिया’ विकसित भारताचा संदेश जगभर पोहोचवत आहे, याचा मला अभिमान असल्याचे भरत गीते यांनी सांगितले.


दुसरे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

INTEX ओसाका हे जपानमधील आमचे दुसरे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे. Tokyo Expo नंतर हा प्रवास अधिक फलदायी ठरला आहे. पुढील काही दिवसांत आणखी जागतिक नेते, भागीदार व सहकाऱ्यांशी भेटून “तौरल इंडिया” च्या नवकल्पनेचा गौरव मांडण्याची उत्सुकता असल्याचे गीते यांनी नमूद

follow us