Download App

लाठीचार्जमुळे वादात सापडलेल्या दोषींना सीआयडीची जबाबदारी, पुण्यातील दोन अधिकारी विदर्भात

  • Written By: Last Updated:

मुंबईः राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer Trasnsfer) बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने सोमवारी बदल्यांचे आदेश काढले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी (Tushar Doshi )यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maratha Reservation : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?

पुणे शहरातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची बदली झाली आहे. त्यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर अमरावतीचे पोलीस उपायुक्त संभाजी सुदाम कदम यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदावर नियुक्ती झाली आहे.

‘राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट..,’; बावनकुळेंच्या कथित व्हायरल फोटोवर फडणवीस बोलले

तर पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्गचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांच्यावर अमरावती पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे हे आंदोलनाला बसले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे दुषार दोषी हे अडचणीत सापडले होते. स्थानिक स्तरावर लाठीचार्ज झाल्याचा चौकशीत समोर आले होते. या घटनेमुळे दुषार दोषी यांना गृहमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांच्यावर जालनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Tags

follow us