Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यामध्ये पडले आहेत.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात…
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यामध्ये पडले आहेत. त्याच झालं असं की, गेल्या काही दिवसांपासून आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत त्यात काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धा अरब राष्ट्रांच्या समर्थनार्थ आणि इस्त्रायलविरोधी कृत्ये करण्यात आली होती. मात्र तो प्रकार पोलिसांनी वेळीच हाणून पाडला.
Tiger 3: कतरिना अन् सलमानचा ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे शहरातील कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक भागामध्ये काहींनी इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर रस्त्यांवर पायदळी येतील या उद्देशाने चिटकवल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी काही वेळातच हा प्रकार उघड करत अशाप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 4 गुन्हे दाखल करण्यात आले.
Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना
यामध्ये लष्कर, समर्थ तसेच खडक व कोंढवा पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी 6 आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी कोंढवा, लष्कर, खडक व समर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही जणांकडून रस्त्यांच्यामधोमध इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर चिटकवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे स्टिकर काढले आणि सबंधितावर गुन्हे दाखल केले. अधिक तपास सुरू आहे.