Tiger 3: कतरिना अन् सलमानचे ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger 3: कतरिना अन् सलमानचे ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger 3 Leke Prabhu Ka Naam song out: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 ) सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कतरिना (Katrina Kaif) आणि भाईजानचा सिनेमातील “लेके प्रभु का नाम” हा धमाकेदार गाणं प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)


या गाण्यात दोघेही ग्लॅमरस अंदाजात बघायला मिळत आहे. ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमात भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) लूकनं देखील चाहत्यांचा लक्ष वेधले आहे. ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला भाईजान म्हणजेच टायगरचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.

यानंतर भाईजान आणि कतरिना कैफ हे अॅक्शन मोडमध्ये दिसतात. ‘जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं…’ हा भाईजानचा डायलॉग ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळत आहे. टायगर-3 या सिनेमाचा ट्रेलर बघितल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, या सिनेमात टायगर हा देशासाठी आणि कुटुंबासाठी आपले प्राण प्रणाला लावणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी हा खलनायकाची भूमिकेत बघायला मिळणार आहे.

भाईजान या ट्रेलरमध्ये काही स्टंट करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तसेच कतरिनाचे देखील काही अॅक्शन सीन्स ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ‘टायगर 3 या सिनेमाचा हा २ मिनिटे ५१ सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा ‘भाईजान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार’, असा अंदाज चाहते लावत आहेत.

Tiger 3: अरिजित सिंगच्या गाण्यावर कतरिनाच्या ग्लॅमरस अंदाजाची झलक पाहिलीत का?

या सिनेमात भाईजान सोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर ‘टायगर 3’ हा सिनेमा यंदा दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube