Pune University Cannabis Case : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार समोर आला आहे. सुमारे ७५० ग्रॅम गांजा सापडल्याची माहिती समोर आली. यावर विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लक्ष घातलं आहे.(Pune University) या प्रकरणी प्रशासनाने काही कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारत प्रशासनावर आरोप केले आहेत. तर, विद्यापी प्रशासनात भाजपचे लोक बसलेत असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला.
धंगेकर काय म्हणाले?
जिथे गांजा सापडला त्या प्रकरणाची गेल्या 16 दिवसांत चौकशी झाली नाही. परंतु, आमच्या संघटनांच्या विद्यार्थ्यांवर खोट्या केस दाखल केल्या जात आहेत. तसंच, कारवाईची मागणी केली तर अधिकारी सांगतात याला कुलगुरूची परवाणगी लागते. मात्र, आज 16 दिवसांपासून चौकशी का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत पुणे विद्यापिठात भाजपच्या विचारांचे लोक काम करतात असा थेट आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. तसंच, काँग्रेसच्या काळात विद्यापीठ प्रशासनात हस्तक्षेप केला नाही. मात्र, भाजपने आपले लोक बसवले आहेत असं म्हणत सत्ता नक्की बदलेलं मग जरूर कारवाई होईल असा इशाराही धंगेकर यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या अंधारे?
एकतर पुण्यात मारामारी, गोळीबार, बलात्कार, हत्या, कोयता गँग दहशत, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री अनाधिकृत पब, बार सुलू आहेत. अशातच असा प्रकार विद्यापिठातून समोर येण हे घातक आहे. त्यावर वेळेत योग्य ती कारवाई होण अपेक्षित होतं. परंतु, अधिकारी सांगत आहेत की, आम्हाला माहिती नाही. आम्ही चौकशी करू असे टोलवा-टोलवीचे उत्तर देत आहेत असा आरोप अंधारे यांनी केला आहे. यावेळी अंधारे यांनी काही कागदपत्रही माध्यमांसरो दाखवले.
Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित केंद्र प्रमुखांसह 6 जण अटकेत
विद्यार्थी संघटनांचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणावरुन आता शहरात सर्वसामान्यांसह सर्वांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत आहे. विद्यापीठामध्ये गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आलं आहे. या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.