Download App

टिळक-साठेंच्या कार्याचा गौरव रंगावलीतून! विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा सोहळा, जाधवर संस्थेचा आगळावेगळा उपक्रम

Jadhavar Group of Institutes Greetings from Rangoli : पत्रकार, लेखक आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak Death Anniversary) आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना भव्य रंगावलीतून (Pune News) अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या वस्तूंचे रेखाटन देखील रंगावलीमध्ये करण्यात आले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, नऱ्हे (Jadhavar Group of Institutes) तर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रंगावली 20 बाय 20 फूट आकारामध्ये साकारण्यात आली.

‘प्रवेश नाही मिळाला… तर संपवतो!’ गरीब आईवडील अजित पवारांना भेटले अन् …

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.

‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित! प्रेक्षकांच्या भेटीला येणार कधी येणार?

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांना आणि फकिरा सारख्या साहित्यकृतीतून लोकजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. तसेच या व्यक्तिमत्वांचे स्मरण करुन त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

 

follow us