‘प्रवेश नाही मिळाला… तर संपवतो!’ गरीब आईवडील अजित पवारांना भेटले अन् …

Ajit Pawar Paid Fees Of Medical Student : राजकारणात कितीही शाब्दिक लढाया सुरू असल्या, तरी एखादा नेता हृदयाने माणूस असतो, हे सिद्ध केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी. त्यांच्या जनता दरबारात आलेल्या बीडमधील (Beed) एका गरीब कुटुंबाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटासमोर हात जोडले आणि त्यांच्या मुलाचं वैद्यकीय शिक्षण वाचलं. ही फक्त बातमी नाही, तर एक जीव वाचल्याची (Maharashtra Politics) गोष्ट आहे.
“प्रवेश नाही मिळाला, तर मी संपवतो स्वतःला…”
गेवराई तालुक्यातील कोलते वाडीचे तुकाराम राजकंवर आणि त्यांच्या पत्नीने मुलाच्या शिक्षणासाठी सर्व काही पणाला लावलं. मुलाला वैद्यकीय प्रवेश मिळाला होता, मात्र कॉलेजने फी भरल्याशिवाय वर्गात बसू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पैशाची कुठेही व्यवस्था होत नव्हती. अशा वेळी मुलानेच पालकांना धमकी दिली. ‘प्रवेश न मिळाल्यास मी आत्महत्या करेन!’
‘नाथसागर पाहायला मी सायकलवर …’ मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
“नाहीतर आम्ही आत्महत्या केली असती…”
शरीर थकलेलं, डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर एकच मागणी – “मुलाचं भविष्य वाचवा.” अशा अवस्थेत ते दोघं मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पोहोचले. अजित पवारांच्या कार्यलयातील पदाधिकाऱ्यांनी या दोघांना अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचवलं. अजितदादांना भेटताच त्यांनी प्राचार्यांना तात्काळ फोन करून ‘फी भरली नाही, तरी मुलाला वर्गात बसवा, आम्ही मदत करतो,’ असा ठाम आदेश दिला.
‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित! प्रेक्षकांच्या भेटीला येणार कधी येणार?
या निर्णयामुळे राजकंवर कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा अंधार दूर झाला. आईवडीलांनी थरथरत्या आवाजात दादांच्या हातात हात घेऊन एकच वाक्य उच्चारलं –“दादा, तुम्ही भेटला नसता तर आज आम्ही आत्महत्या केली असती…”
एक नेता, एक हृदय
ही घटना केवळ मदतीची नाही, तर सत्तेत असूनही सामान्यांच्या वेदना समजून घेणाऱ्या नेत्याचं दर्शन घडवणारी आहे. अजित पवार यांचा हा निर्णय समाजातील असंख्य आशावादी, पण संकटात अडकलेले पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी दिलासा देणारा ठरतो. या प्रसंगानंतर दादांची प्रशंसा सोशल मीडियावरही होत आहे.