झोमॅटोही आता महागले ! फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म फी 19 टक्क्यांनी वाढली

Zomato-सध्या एका ऑर्डरसाठी ग्राहकांना 12. 5 रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यात वाढ करून ही शुल्क 14.9 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
Zomato Fee Hike

Zomato hikes food delivery platform fee : इराण-इस्रायल (Iran-Israel) युद्धामुळे गॅस, तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. तर व्यवसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल बंद पडले आहेत. काही हॉटेलांनी पर्याय शोधले असले तरी पदार्थांच्या किंमती वाढविल्या आहेत. आता तर झोमॅटोवरूनही खाद्य पदार्थ मागविणे महाग झाले आहे.

इटरनल लिमिटेडच्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म शुल्क प्रति ऑर्डरप्रमाणे वाढविले आहे. सध्या एका ऑर्डरसाठी ग्राहकांना 12. 5 रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यात वाढ करून ही शुल्क 14.90 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये 19 टक्के वाढ झाली आहे.

कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे झोमॅटोने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे झोमॅटोवर सूचीबद्ध असलेले रेस्टॉरंट्स आणि फूड टेक प्लॅटफॉर्मच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

स्विगी सध्या किती दर आकारते ?
यापूर्वी अशी दरवाढ सप्टेंबर 2025 मध्ये करण्यात आली होती. झोमॅटोची फूड डिलिव्हरीमधील प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी सध्या प्रति ऑर्डर 14.99 रुपये शुल्क आकारत आहे.

रॅपिडो डिलिव्हरी शुल्क किती ?
‘रॅपिडो’ने बंगळूरुमध्ये आपली ‘ओनली’ ही फूड डिलिव्हरी सेवा सुरू केलीय. ते डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त ग्राहक किंवा रेस्टॉरंटकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारात नाहीत.

follow us