अशोक खरातप्रकरण रुपाली चाकणकरांना नडलं, महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडलं
Rupali Chakankar--खरात याच्या धार्मिक संस्थेवर चाकणकर या विश्वस्त आहे. त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे, असा दबाव त्यांच्यावर आलेला आहे.
Rupali Chakankar: राज्यात नाशिकचे अशोक खरात प्रकरण गाजत आहे. अडचणी सोडविण्याच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी खरात अटकेत आहे. एसआयटी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या खरातला गुरु मानत होत्या. खरात याच्या धार्मिक संस्थेवर चाकणकर या विश्वस्त आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे, असा दबाव त्यांच्यावर आलेला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे.
Letsupp Exclusive : पाथर्डीतील जमीन, भोंदू अशोक खरातसोबत अतिरिक्त कलेक्टरचे डील सापडले
अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील, शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांनी गंभीर आरोप केले आहे. सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपद सोडावे. अशोक खरात प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी होण्यासाठी रुपाली चाकणकर यांनाही अटक केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलीय.
शेतजमीन, फॉर्महाऊस ते भूखंड; भोंदू अशोक खरातकडे कोट्यवधींची माया…
चाकणकर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यानंतर शुक्रवारी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश दिला असल्याची माहिती अनेक वृत्तवाहिन्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी चाकणकर या महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास व्हावा-चाकणकर
रुपाली चाकणकर यांनी मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे, असे पत्रही चाकणकर यांनी दिले आहे.