Download App

पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? जगदीश मुळीकांचा सुप्रिया सुळेंना सवाल

  • Written By: Last Updated:

Jagdish Mulik On supriya sule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यात अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले होते, असं सांगितलं होतं. खासदार सुप्रिया सुळेंनेही फडणवीसांना जबाबदार धरलं होतं. दरम्यान, आता भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार पलटवार केला.

जगदीश मुळीक यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुळीक म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुप्रिया सुळे फडणवीसांवर जी टीका करतात ती दुर्देवी आहे. गेल्या चार दशकांपासून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. हा प्रश्न प्रलंबित का राहिला? चारवेळा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असं असतांनाही त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल मुळीक यांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार ? 

ते म्हणाले, जेव्हा तुमची सत्ता राज्यात असते, तेव्हा आपण सोईस्कररित्या मराठा आरक्षणाचा प्रश्न विसरता आणि सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करता. मराठा समाजाला भडकवता. तुमच्याकडून आणि तुमच्या पक्षाकडून आरक्षणावरून राजकारण केलं जातं.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, नंतर मविआचं सरकार आलं, तेव्हा कोर्टात हे आरक्षण टीकलं नाही. हे तुमचं अपयश आहे. आणि हे अपयश लपवण्यासाठी लोकांना भडकवण्यासाठी तुम्ही फडणवीसांवर टीका करता. फडणवीस हे सर्वांना, सर्व जातीपातींना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. तुम्ही जी टीका करता, ती चुकीची आहे. ही टीका राजकीय द्वेषातून केला जात आहे. ही टीका लोक सहन करणार नाहीत.

सध्याचं महायुतीचं सरकार समाजाला हे सरकार सक्षण आहे. सरकार आरक्षण मिळवून देईल, असंही मुळीक म्हणाले.

लाठीचार्जच्या घटनेनंतर फडणवीसांना माफी मागितली. यावरही मुळीक यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, एखाद्या घटनेनं एखादा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काही नाही. तुमची परंपरा खोटं बालून वेळ मारून न्यायची आहे, आमची पंरपरा ही नाही, अशी बोचरी टीका मुळीक यांनी केली.

Tags

follow us