मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार ?

मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार ?

Ajit Pawar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून अंतरवाली गावात मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. काल जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतरही आपल्या उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही, त्यामुळं सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नाही. उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूरला रवाना होण्याआधी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील आंदोलनाबाबत महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचे काम अद्याप कुणीही करू शकलेले नाही. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी उद्या राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली आहे. या बैठकीत अन्य राजकीय पक्षांचं काय मत आहे हे जाणून घेण्यात येणार आहे. यामध्ये आता कुणबी समाजाने आमच्यात कुणाल घेऊ नका अशी मागणी केल्याचे माझ्या वाचनात आले आहे.

‘भावी मुख्यमंत्री, जादूई आकडा अन् वेळेचं गणित’ गुगली प्रश्नांना अजितदादांचं ‘सेफ’ उत्तर

तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांचीही वेगळी मते समोर आली आहेत. यातून कुणालाही न दुखावता मार्ग निघाला पाहिजे यात कुणाचंच दुमत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी मागील सरकारच्या काळात आम्ही केला. आम्ही घेतलेला निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकला नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही. म्हणजे याकडे कुणी दुर्लक्ष करतंय असं बिलकुल नाही. चर्चेतून नेहमीच मार्ग निघत असतो. चांगल्या सूचना येतात. बाकीच्यांच्या मनात नेमकं काय आहे हे देखील राज्याच्या प्रमुखांना समजत असतं. त्यातूनच हा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे बैठकीला जाणार का ?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक आयोजित केली आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, मनस यांच्यासह शिवसेना ठाकरे गटालाही बैठकीचे निमंत्रण देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील सध्याचे वितुष्ट पाहता उद्धव ठाकरे बैठकीचे निमंत्रण स्वीकारतील का, बैठकीला उपस्थित राहतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube