Ravindra Dhangekar On Jain Boarding Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेनेच्या रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर स्वतः मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींची भेट घेत 1 नोव्हेंबरच्या आता हा विषय जैन समाजाला अपेक्षित असेल अशा पद्धतीने संपलेला असेल असा शब्द दिला होता. त्यानंतर काल (दि.26) गोखले बिल्डरकडून संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याचा मेल ट्रस्टींना करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते, असा दावा रविंद्र धंगेकरांनी केला आहे. व्यवहार रद्द करण्याचा घटनाक्रम नेमका कसा याबद्दल खुद्द धंगेकरांनी काय सांगितलं ते पाहूया…
राजकीय हस्तक्षेपानंतर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द!
जैन धर्मियांसह राजकीय स्तरावरून होत असलेल्या विरोधानंतर अखेर रविवारी रात्री गोखले बिल्डर यांच्याकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आला. यानंतर या प्रकरणी आक्रमक पवित्र घेतलेले रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं. दोन दिवसांत यावर तोडगा निघेल. त्यामुळे हा व्यवहार रद्द झाल्याने मी आनंदी आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील हे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते. त्या अगोदर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निरोप घेऊन आल्याचा दावाही धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे शाह यांनी चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मोहोळांना हा व्यावहार रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं धंगेकरांच्या दाव्यानंतर बोललं जात आहे.
मोठी बातमी! अखेर गोखले बिल्डरकडून जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द; म्हणाले, नैतिकतेच्या…
तसेच यावेळी धंगेकर यांनी मोहोळांवर आणखी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, गोखले बिल्डर हा व्यवहार करण्याएवढा मोठा नाही. मोहोळ पुणे महापालिकेच्या स्थायी समीतीचे अध्यक्ष झाल्यानंतर गोखलेच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मात्र मला या विषयांवर जास्त बोलायचं नाही. कारण मला एकनाथ शिंदे यांनी काहीही बोलायला सांगितलेलं नाही.
आम्ही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी… जैन बोर्डिंग प्रकरणी राजू शेट्टी यांनीही दिला मोहोळांना इशारा
मात्र गोखले सारख्या माणसाकडून हा व्यवहार कोण करून घेत होतं? असा सवाल करत धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी जरी हा व्यवहार रद्द केल्याचा मेल केला गेला असला तरी देखील पूर्ण व्यवहार रद्द होत नाही. तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं म्हटलं आहे. कारण हा व्यवहार ट्रस्टींनी केला आहे. ते पळून गेले तर काय करणार? अशी शंका देखील धंगेकरांनी व्यक्त केली आहे.
अखेर गोखले बिल्डरकडून व्यवहार रद्द !
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा गैरव्यवहार प्रकरणी वातावरण तापल्यानंतर अखेर बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गोखले यांनी ईमेलवरून जैन ट्रस्टला माहिती दिली आहे. त्याचबरोबर व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्याची विनंती केली. धर्मादाय आयुक्तालयाला देखील पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहेय तसेच जैन धर्मियांच्या यामुळे भावना दुखवायच्या नव्हत्या. असेही गोखले बिल्डर म्हणाले आहेत.
