Download App

बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची चर्चा; महाविकास आघाडीचा उमदेवार कोण? जयंत पाटील म्हणाले…

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Jayant Patil on Baramati Loksabha : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारातमीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेनंतर बारामती लोकसभेची जागा चर्चेत आली आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आगामी निवडणुकीत बारामतीतून कोणाला उमेदवारी देणार? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला असता ते म्हणाले की, मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. कोण कोणाला तिकीट देईल हे माहीत नाही. पण 2024 ची निवडणूक राष्ट्रवादीकडून फक्त सुप्रिया सुळे लढणार आहेत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून लढायचे हे ठरवू, असं पाटील म्हणाले.

‘शरद पवारांवर टीका करीत नाही पण..,’ शरद पवारांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांची भूमिका 

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, संसदेचं अधिवेशन सुरू असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नसेल म्हणून काढला असेल. उद्योगपती अदानी यांनी नवीन उद्योग सुरू केला आहे. पवारांनी त्यांच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली त्यात गैर काय? तो प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेला नाही. त्यांना नवा प्रोजेक्ट साहेबांना दाखवायचा आहे. पवार साहेब सध्या इंडिया आघाडीत आहेत. त्यात काही शंका घेऊ नये, असं पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहेत. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, यावर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का? आम्ही ठरवू… लोकशाहीत कोणीही पोस्टर लावू शकतो. समर्थक कोणाला कुठंही नेऊन बसवतात. शरद पवारांकडे नेते आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री व्हावं, असे अनेक नेते आहेत. अनेकांचे प्लेक्स लागतात, असं पाटील म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज