‘शरद पवारांवर टीका करीत नाही पण..,’ शरद पवारांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांची भूमिका

‘शरद पवारांवर टीका करीत नाही पण..,’ शरद पवारांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांची भूमिका

Prafull Patel On Sharad Pawar : शरद पवारांवर टीका करीत नाही पण त्यांनी आमची भूमिका स्विकारावी, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी गुजरातमधील एका उद्घाटनादरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी(Sharad Pawar) प्रफुल्ल पटेलांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बॅनरचा फायदा काय? CM होण्यासाठी तर.. अजितदादांचा रोहित पवारांना खोचक टोला

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली, मी ती जबाबदारी पार पडली आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे केलं म्हणूनच मला उजवा हात समजत होते, आज मी शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी सत्तेत बसलो नसून त्यांची राजकीय भूमिका वेगळी असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

KBC’ मध्ये अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं पाहा…

तसेच शरद पवार यांच्यावर टीका करीत नाही पण त्यांची जी राजकीय भूमिका होती, त्यापेक्षा आम्ही घेतलेली भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी आमची भूमिका स्विकारावी, असं शरद पवार म्हणाले आहेत.

चीनची रेलगन सुसज्ज आण्विक विमानवाहू नौका सज्ज, हिंदी महासागरात भारताला थेट धोका

काय म्हणाले होते शरद पवार?
गुजरातमध्ये उद्योजक गौतमी अदानी यांच्या कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती., या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी गुजरातमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी महत्वाची पदे देऊनही ते अजित पवारांसोबत गेले आहे, अशी नाराजी शरद पवार यांनी बोलून दाखवली होती.

आमदार अपात्र होणार म्हणूनच राहुल नार्वेकरांची चालढकल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला.

दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राज्यातील विविध जिल्ह्यात जाहीर सभा घेत एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलीयं, त्यावर प्रफुल्ल पटेल यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पटेलांच्या भूमिकेवर शरद पवार काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube