Download App

“घरचे नीट राहणार नाहीत म्हणत दिला दम”, हगवणेंनी केली 11 लाखांची फसवणूक; तक्रार दाखल

खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

Pune News : सासरच्यांकडून सतत होणारा छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणे या (Vaishnavi Hagawane) विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद अटकेत आहेत. आता हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढू लागल्या आहेत. शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध आणखी एका व्यक्तीने तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. खेड तालुक्यातील निगोजे येथील प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाखांचा जेसीबी विकत घेतला होता. हा व्यवहार मार्च 2022 मध्ये झाला होता. येळवंडे यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. या जेसीबीवर बँकेचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासठी येळवंडे यांनी दर महिन्याला हगवणे यांनी 50 हजार रुपये देण्याचेही ठरले होते. यानुसार कर्जाचे हप्ते भरण्यासाठी लता हगवणे यांच्या बँक खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा करण्यात आले होते.

हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा, पिस्तूल परवान्यासाठी पोलिसांची फसवणूक; गुन्हा दाखल

परंतु, त्यांनी बँकेचे हप्ते न भरता ही रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकेने ऑगस्ट 2024 मध्ये प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबीचा ताबा घेतला होता. यानंतर हगवणेंनी हा जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला. पण प्रशांत येळवंडेंना दिला नाही. स्वतःकडेच ठेऊन घेतला. त्यामुळे जेसीबीसाठी दिलेले 11 लाख 70 हजार रुपये परत द्यावेत नाहीतर जेसीबीचा ताबा द्या अशी मागणी येळवंडेंनी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे किंवा जेसीबी यातील काहीच मिळालं नाही म्हणून येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याची माहिती मिळाली आहे.

हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा

पिस्तुलाचा परवाना मिळवताना आपण पुण्यातील रहिवासी असल्याचे पत्ते हगवणे बंधुंनी दिले होते. पुणे पोलीस आयु्क्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला? विशेष म्हणजे एकाच दिवशी परवाने आले होते. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवले म्हणून हगवणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या संशयावरून तिघे ताब्यात; दोघांना सोडले

follow us