“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग…” पुण्यातल्या भावी खासदारांच्या बॅनरवर जितेंद्र आव्हाड म्हणतात…

“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.  भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.  भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे.

Vijay Shivtare : ते मिडीयापुरतेच मर्यादीत त्यांना बाष्कळ गप्पांची सवय, संजय जगतापांची शिवतारेंवर टीका

याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर टीका करणारे ट्विट लिहले आहार. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की “१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार”

दरम्यान या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर मुळीक यांनी सावरती भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून जाहीर केलं आहे की माझ्या वाढदिवसदिनी अर्थात १ एप्रिल दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता. आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्‍चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद! यंदा लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे माझा १ एप्रिल, २०२३ रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला असून याची सर्वांनी नोंद घ्यावी ! वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Exit mobile version