Download App

बेरोजगारांसाठी मोठी बातमी : नोकरी हवी असेल तर 12 तारखेला पुण्यात दाखल व्हा!

पुणे : बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने येत्या 12 एप्रिल रोजी पुण्यात यंदाच्या वर्षीचा पहिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार?

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळावा आयोजित करण्यामागे सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

फुकरे ते फुकरेच, तीन पैशांचा तमाशा करणाऱ्यांना.. लाडांचा राऊतांना रोखठोक इशारा !

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र उमेदवारांची कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून कार्यालयातच मुलाखती घेण्यात येणार आहे. मुलाखतीत पात्र झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

…तर नातेवाइकांच्या ठेवी तुम्हाला मिळणार; आरबीआयचा मोठा निर्णय

पुण्यातल्या बेरोजगार युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आलं आहे. त्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळाला भेट देऊन नोंदणीही करण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

Photos : 2023 वर्षासाठीचे तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान

उमेदवारांनी लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘1st PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.

उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुनय योग्य असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

दरम्यान, ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी 12 एप्रिल रोजी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केलंय.

Tags

follow us