Download App

निखिल वागळे यांनी केलं राज ठाकरेंचं जाहीर कौतुक

Nikhil Wagale On Raj Thackeray :  राजकीय पक्षांवर सडेतोड टीका करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जाहीर कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत झाली होती. तेव्हा, राज ठाकरेंनी केलेले विधान हे मला पटलेले आहे, अस परखड मत निखिल वागळे यांनी व्यक्त केलं. तर आजच्या पत्रकाराने फक्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुरताच मर्यादित पत्रकार न राहता मल्टिमीडिया पत्रकार होणे गरजेचे आहे असे ही मत वागळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले आहे.

वागळे म्हणाले, पत्रकारिता सर्वंकष व्हायची असेल तर समाजाच्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. सामान्य माणसांचे महत्त्वाचे प्रश्न पत्रकारांनी हातात घेतले पाहिजेत.डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले

पुणे पत्रकार संघात कै. वरुणराज भिडे पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी निखिल वागळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. या वेळी निखिल वागळे यांच्या हस्ते पुरस्कारतींचा गौरव करण्यात आला. पुरस्कारतींमध्ये दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर, महाराष्ट्र टाईम्सच्या चैत्राली चांदोरकर, पुढरीच्या सुषमा नेहरकर-शिंदे व एबीपी माझाचे पत्रकार अभिजीत करंडे यांचा समावेश आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, भिडे यांनी आपल्या विश्लेषणाद्वारे समाजाला दृष्टी दिली ती आजही कायम आहे. त्यांचे कार्य मोलाचे होते. पूर्वीचे राजकारण वेगळेच होते. आजच्या घडीला संवाद केला तर संशयाची सुई आपल्यावर असते, तर दुसरीकडे आज राजकारणात एकमेकांशी संवाद नसल्याची स्थिती आहे. तुम्हाला दिसते तेवढेच काम करा, अनेक गोष्टींची माहिती मिळत नाही, त्यामुळे वस्तुस्थितीच कळत नाही. म्हणून अशावेळी संवाद कसा घडवायचा हे अवगत झाले पाहिजे. आज राजकारणात अस्थिरता झाली आहे. अनिश्चितेच्या काळात वातावरण गढूळ होत चालले आहे. त्यात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्या अस्वस्थ आहे. या पार्श्वभूमीवर संवादाची गरज आहे.

Barsu Refineray : उद्योगमंत्री उदय सामंतांनी ‘या’ मुद्यावर शरद पवारांशी केली चर्चा

यंदाचे वर्ष हे या पुरस्काराचे 21वे वर्ष आहे. मराठी पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पत्रकारांना कै. वरुणराज भिडे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या कौस्तुभ राणे आणि चालू घडामोडी विषयात प्रथम क्रमांक मिळविणारा सुनील जाधव यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्राच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Tags

follow us