Download App

पुण्यात एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी म्हणाले, “रिझल्ट मिळण्याशी मतलब…

पुणे : आज प्रचाराचा वेळ संपण्याअगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Constituency)  रोड शो केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार भाषण करत भाजपाच्या रासने यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar)  यांच्यावर घणाघात टीका करत असताना ते म्हणाले की, माझ्यावर काल टीका झाली. मी चुकून एमपीएससीच्या मागण्या निवडणूक आयोगासमोर (Election Commission)  मांडणार असे म्हणालो. असो काही देखील हरकत नाही. निवडणूक आयोग असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे बोलतो ते करून दाखवतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत. MPSC आंदोलनाला जे यश आले आहे, त्याचे कोणतेही श्रेय आम्हाला घ्यायचं नाही. या विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका राहणार आहे. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो. असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे, एमपीएससीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द दिला तो आम्ही पूर्ण केला. माझ्या तोंडून चुकून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा शब्द वापरला गेला. कोणताही आयोग असूदे रिझल्टला महत्त्व आहे. रिझल्ट देण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.

देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न, कसबा-चिंचवडचा प्रचार संपताना टीव्हीवर मुलाखत

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने रोड शो काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि सर्व मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यात सत्तांतरानंतर थेट मतदारांचा कौल आजमावण्यासाठी ही पहिली निवडणूक असल्याने कोणतीही कसर सोडायची नाही, या निर्धाराने भाजप पक्षाने ही प्रचार यंत्रणा आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत.

Tags

follow us