पुणे : राज्यात कसबा – चिंचवड निवडणुका चांगल्याच गाजू लागल्या आहेत. यातच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कसबा (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. यातच कसब्यात पुणेरी पाट्या या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लावतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही अमिष दाखवू नयेत” #यंदाकसब्यातधंगेकरच” अशा पुणेरी पाट्या कसबा मतदारसंघात दिसत आहेत.
पुण्यात कसबा-चिंचवड (Kasba By-Election ) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यां दोन्ही गटांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावला जात आहे. येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी यापूर्वी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे.
Earthquake : सीरिया-तुर्कीनंतर आता पूर्व ताजिकिस्तानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप
यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनाच मतदान करण्यात यावं यासाठी अनोख्या पुणेरी पाट्या कसब्यात लावण्यात आलेल्या आहेत. “येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप – मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!” #यंदाकसब्यातधंगेकरच” अशा मजकुराच्या पाट्याही कसबा मतदारसंघात दिसून आले आहेत. या पाट्या नेमक्या कोणी लावल्या यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते. हे कृत्य काँग्रेस नेत्याने केले असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल
भाजपकडून प्रेस नोट जारी
आपल्या कसब्यातील पेठा विद्रुप करणारा सापडला, रात्री 2.30 वाजता चोरून चौका चौकात, आपल्या सोसायटीमध्ये पाट्या लावत होता. हा काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल जाधव हा पुणे मनपामध्ये शिक्षण मंडळात काम करत असून यासोबत आणखी दोन सहकारी होते. अश्या प्रकारे पुणे शहर खराब करण्याचे काम करतोय यांचा जाहीर निषेध….!! बाकी आपले कसबावासी सुज्ञ आहेत. याचे उत्तर 26 तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून देतीलच.
कसब्यात कमळच….!!