Download App

Kasba Bypoll : कॉंग्रेसमधील बंड शमलं, दाभेकरांचा फुसका बार

  • Written By: Last Updated:

Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे.

हेही वाचा :  Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली नाही म्हणून पोटनिवडणुकीत उडी घेणारे… आनंद दवेंची संपत्ती किती?

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच बंडखोरी उफाळून आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीचसमोर दाभेकरांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.

याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती. अखेर महाविकास आघाडी आणि भाजपच्या शिष्टाईला मोठं यश आलं असून बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

 

Tags

follow us