Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली नाही म्हणून पोटनिवडणुकीत उडी घेणारे… आनंद दवेंची संपत्ती किती?

Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली नाही म्हणून पोटनिवडणुकीत उडी घेणारे… आनंद दवेंची संपत्ती किती?

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली नाही. याबाबत आवाज उठवणारे हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी भाजपवर (BJP) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याचा जबर फटका भाजपला बसेल असे सांगत पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार करून आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली ३२ वर्षे कसबा पेठ मतदार संघांचे प्रतिनिधित्व ब्राह्मण समाज (Brahmin Community) करत आहे. मग आता एनवेळी भाजपने ब्राह्मण समाजाला उमेदवारी का नाकारली, असा सवाल देखील उपस्थित करत स्वतः अर्ज भरणारे आनंद दवे यांच्याकडे रोख दीड लाख रुपयांची रक्कम आहे. तसेच ६२ लाख रुपये किंमतीचा एक फ्लॅट, एक लाख रुपये किंमतीचे सोने तसेच एक लाख ८० हजार रुपयांचे कर्ज देखील असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केलेल्या विवरण पत्रात जाहीर केले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा पेठ मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी द्यायला हवी होती. अशी हिंदू महासंघाची मागणी होती. परंतु, भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारत येथे हेमंत रासने हा बिगर ब्राह्मण उमेदवार दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाराज आनंद दवे यांनी स्वतःच पोटनिवडणूक लढवून भाजपला धडा शिकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.

आनंद दवे हे बारावी पास आहेत. ते व्यवसाय करत असून त्यांच्या नावावर एक फ्लॅट आहे. बँकेत एक लाख रुपये किमतीच्या ठेवी आहेत. त्यांना शेतजमीन नाही. तसेच त्यांच्या नावावर कर्ज देखील आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ४० हजार रुपयांची रोकड तसेच चार लाख रुपये किंमतीचे सोने आहेत. आनंद दवे यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube