पुणे : राज्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत महत्वाची बनत चालली आहे. कसबा भाजपचा बालेकिल्ला असल्याने भाजपने जोरदार तयारी केली तर या निवडणुकीत इतर पक्षांनी देखील उमेदवार दिले आहे. यातच मनसेने कसबा व चिंचवड पोटनिवडणुकसाठी भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले अशा शब्दात पवारांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
पुण्यात श्री वृद्धेश्वर, सिद्धेश्वर मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मनसेवर मिश्किल टोला लगावला आहे. दरम्यान तत्पूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा व चिंचवड या पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. मनसेचा भाजपला पाठिंबा याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. पवार म्हणाले, अरे बापरे एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला. आमचे धाबेच दणाणले. आता आम्हाला फार काळजी घ्यावी लागेल, अशा शब्दात मनसेवर पवारांनी निशाणा साधला.
Kasba By Election : प्रचारात गुंडांना घेऊन दहशतीचा प्रयत्न, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर आरोप
दरम्यान मुंबईत मनसे पुणे शहर कार्यकारिणीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत भाजपला पाठिंबा द्यायचा, मात्र प्रचारात सहभागी व्हायचं नाही असा निर्णय घेतला होता.