Kasba By Election : प्रचारात गुंडांना घेऊन दहशतीचा प्रयत्न, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर आरोप

Kasba By Election : प्रचारात गुंडांना घेऊन दहशतीचा प्रयत्न, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर आरोप

पुणे : मंत्री गिरीश महाजनांकडून प्रचारात गुंडांना घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारात कुख्यात गुन्हेगार संतोष लांडे प्रचारात उतरल्याचं दिसले. त्यानंतर अजित पवारांनी संबंधित व्यक्तींवर ताबडतोब कारवाईची मागणी केलीय.

Air India : टाटांचे जम्बो डील ! अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच कसबा पेठ मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी काल भाजपचे अनेक दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून होते.

Kasba – Chinchwad By Poll : ‘मविआ’अन आता सेना-वंचित युतीचा पहिला प्रयोगही चिंचवड अन कलाटेंवरचं?

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाजपचे मंत्री गिरीश महाजन कुख्यात गुंड संतोष लांडे यांना घेऊन फिरत असल्याचा आरोप अजित पवारांकडून करण्यात आलाय.

हे चुकीचं असून पोलिसासंह निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, सत्ताधारी पक्षाचा एखादा मंत्रीच असं करत असेल आणि शक्तीप्रदर्शन करीत असेल तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन दहशत करण्याच प्रयत्न करत असेल तर पोलिस आयुक्तांनी याची नोंद घेऊन कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Girish Bapat : व्हील चेअरवर बसून ऑक्सिजनच्या नळकांडीसह गिरीश बापट भाजपच्या प्रचारात

दरम्यान, कसबा पेठ मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगरेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कसबा पेठ मतदारसंघात रासने आणि धंगेकर यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे.

तर हिंदु महासंघाचे आनंद दवे यांनीही निवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच चिंचवड मतदारसंघात भाजपकडून आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटेंना रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube