Air India : टाटांचे जम्बो डील ! अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

Air India : टाटांचे जम्बो डील ! अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

Air India : एअर इंडिया (Air India) ८४०विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासामधील सर्वात मोठा करार राहणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याअगोदर मिळाली होती. मात्र आता एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानाविषयी कराराबाबत मोठी अपडेट देण्यात आली. यानुसार एअर इंडिय एकूण ८४० एअरबस (Airbus) आणि बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यात हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार असणार आहे.

अमेरिकेकडून ८४०विमानं खरेदी करणार
एअर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर निपुण अग्रवाल यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये सांगितलं आहे की, एअर इंडियाच्या कराराविषयी संपूर्ण जगभरात उत्सुकता बघायला मिळत आहे. हा प्रतिसाद बघता आम्ही कृतज्ञ आहोत. निपुण अग्रवाल यांनी पुढे सांगितलं आहे की, एअर इंडियाच्या विमान खरेदीचा होणारा नवीन करार हा सुमारे २ वर्षांअगोदरच एअर इंडियाच्या खाजगीकरणापासून सुरू झालेल्या अद्भुत प्रवासाचा भाग राहिला आहे. पुढील काळात एअर इंडियाने ४७० हलकी विमानं आणि ३७० विमानं खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबसशी करार केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

४७० विमान कराराची बातमी

एअर इंडिया फ्रेंच आणि अमेरिकन कंपनी एअरबस आणि बोईंगकडून ४७० विमाने खरेदी करणार आहे, अशी बातमी १४ फेब्रुवारी दिवशी समोर आली होती. यात २५० एअरबस विमानं आणि २२० बोईंग विमानांचा समावेश होता. तसेच या करारात अतिरिक्त ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे. या कराराने टाटा समूहाच्या मालकीचे एअर इंडियाच्या ताफ्यात ४० पूर्ण आकाराची A३५० आणि २१० लहान आकाराची विमाने समाविष्ट होणार आहेत. यात एअरबस कंपनीच्या A-३२०/३२१, NEO/XLR आणि A३५०-९००/१००० या विमानांचा समावेश करण्यात आला. शिवाय १९०, ७३७-MAX, २० ७८७ आणि दहा ७७७ या बोईंग विमानांचा समावेश करण्यात आला. या करारानंतर एअर इंडियाच्या ताफ्यात B७३७-८०० विमानाचा समावेश होणार असल्याचे सांगितलं जात आहे.

एअर इंडियाची मालकी TATA कडे

एक नाही दोन नाहीतर तब्बल ६७ वर्षांनी एअर इंडियाची मालकी परत एकदा टाटा सन्सकडे आली. यानंतर टाटा विमान वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. एअर इंडियाला १९३२ मध्ये टाटा ग्रुपनं सुरु केलं होतं. टाटा समूहाकडे जे.आर.डी.टाटा यांनी या विमान कंपनीची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळेस एअर इंडियाचं नाव टाटा एअर सर्विस ठेवण्यात आलं होतं. १९३८ पर्यंत या कंपनीने देशांतर्गत उड्डाणं सुरु केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर या कंपनीचे सरकारी कंपनीत रुपांतर करण्यात आले आहे. यानंतर परत या कंपनीची मालकी टाटा सन्सकडे देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube