Ketan Agarwal murder case Siya-Chetan gotten married four months ago Major revelation from WhatsApp chats : संपूर्ण राज्यात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात सखोल चौकशी सुरु असताना व्हॉट्सॲप चॅटमधून मोठा खुलासा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या केसला नवे वळण मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सिया-चेतनचं चार महिन्यांपू्र्वीच झालं होतं लग्न?
व्यावसायिक केतन अग्रवालच्या खूनप्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.दोघांच्या चौकशीदरम्यान तसेच त्यांच्या मोबाइलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे.
Cristiano Ronaldo : रोनाल्डोचे स्वप्न अधुरेच, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला
याच दरम्यान तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा आहे. प्राथमिक माहितीनुसार, केतन आणि सिया यांचा विवाह 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुडा समारंभाच्या आसपासच्या कालावधीत पार पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हा विवाह नेमका साखरपुड्यापूर्वी झाला होता की त्यानंतर, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सावधान! खडकवासलातून कधीही विसर्ग होणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तर या अगोदर सिया गोयलच्या स्नॅपचॅट मॅसेजेसमुळे धक्कादायक माहिती समोर आली होते. हा खून एक पूर्व नियोजित कट असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सियाचे समोर आलेले स्नॅपचॅट मॅसेजेस हे 25 मे चे असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीशी तिच्या लग्नाला येण्याच्या बाबतीत बोलत आहे. तिचं लग्न राजस्थानमध्ये एक डेस्टीनेशन वेडिंग होणार होतं. ज्यासाठी प्रायव्हेट जेट बुक केलेलं असल्याने पाहुन्यांना त्यांचे आधीर कार्ड मागितले जात होते. त्यात सिया समोरील व्यक्तीला म्हणते की, आधार कार्ड फ्रंट बॅक भेज दे. लग्नाचे तिकीट काढण्यासाठी जे होणारच नाहीये. तरी देखील पाठवं.
