Download App

Kishor Aware Murder Case : गुन्हा दाखल होताच रोहित पवार सुनील शेळकेंच्या भेटीला

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar Meets Suneel Shelke : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या आवारे यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. या हत्येतनंतर आवारे यांच्या आईने केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनील शेळकेंची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतल्याचा एक फोटो समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

Sameer Wankhede : 18 कोटींवर डील ठरली, 50 लाखांचं टोकन; सीबीआयचे वानखेडेंवर गंभीर आरोप

दरम्यान, सुनील शेळके आणि आमदार रोहित पवार यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शेळकेंच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहित पवार आवर्जून उपस्थित असतात. शेळकेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज रोहित पवार थेट शेळकेंच्या घरी आल्याने चर्चांना उधाण आले. आवारे यांच्या हत्येनंतर या हत्येचा कट शेळकेंनी रचल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आईने केला होता. त्यांच्या या आरोपांची दखल घेत पोलिसांनी शेळकेंसह चार अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. परंतु, पोलीस तपासात घटनेला वेगळेच वळण लागले आहे.

पुणे जिल्ह्याचे विभाजन करा; आमदार लांडगेंची फडणवीसांकडे मागणी; जिल्ह्याला नावही सुचवलं

माजी नगरसेवकाच्या मुलाने रचला हत्येचा कट
आवारे यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर आरोप करण्यात आले होते. मात्र, पोलीस तपासात या हत्येला वेगळ वळण मिळाले आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. डिसेंबर महिन्यात तळेगाव नगरपरिषदेच्या परिसरात किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. भानु प्रताप खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार आवारेंनी केली होती. परंतु, ही वृक्षतोड परवानगीने केल्याचा दावा खळदे याने केला होता. वडिलांच्या कानशिलात लगावलेली गोष्ट गौरवच्या जिव्हारी लागली. या गोष्टीवरून गैरवचे मित्र त्याची चेष्टा करत असे. त्यामुळे गौरवने आवारेंचा काटा काढायचा निश्चय केला.

भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

असा रचला हत्येचा कट
गौरव हा माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. पेशाने तो सिव्हिल इंजिनिअर आहे. हत्या करणाऱ्या श्याम निगडकरशी त्याची मैत्री होती. गौरव श्यामला खर्चासाठी पैसे देत असे. वडिलांना कानशिलात लगावलेल्या घटनेचा बदला घेण्याचं प्लानिंग जानेवारी पासूनच रचायला सुरूवात केली. त्यासाठी त्याने श्यामकडून हे काम करून घेण्याचे ठरवले. वेळोवेळी पैशांची मदत करणाऱ्या गौरवसाठी हे काम करण्यास श्यामने होकार दिला. यासाठी श्यामने अन्य काही साथीदारांना सोबत घेत किशोर आवारेंची दिवसाढवळ्या हत्या केली.

Tags

follow us