Download App

PMO कार्यालयात उपसचिव ते बीडचे जिल्ह्याधिकारी, जाणून घ्या पुण्याचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांच्याबद्दल सर्वकाही

Naval Kishore Ram : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 8 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांचे बदल्या

Naval Kishore Ram : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 8 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांचे बदल्या केल्या आहे. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी पुणे महानगर पालिकेची (Pune Municipal Corporation) जबाबदारी आयएएस अधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांच्याकडे दिली आहे. आता नवल किशोर राम पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) निवृत्त झाल्यानंतर पुण्याला नवीन आयुक्त मिळाले आहे.

कोण आहेत नवल किशोर राम?

पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त नवल राम किशोर बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे असून हे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची पुढे आयएएसमध्ये निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषेदत देखील दोन वर्षे काम केले आहे. तसेच त्यांनी बीड आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

तर 2020 मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी संभाळली आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गावात भेटी दिल्या होत्या. यानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

1. नवल किशोर राम : आयुक्त, पुणे महानगरपालिका

2. शीतल तेली-उगले : क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे

3. जे.एस. पापळकर : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर

4. सी.के. डांगे : सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग

5. सौरभ कटियार : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

6. भाग्यश्री विसपुते : जिल्हाधिकारी, धुळे

पुन्हा धो धो…, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

7. आनंद भंडारी : मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद

8. आशिष येरेकर : जिल्हाधिकारी, अमरावती

follow us