Kundmala Bridge Accident Rescue Again : पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना (Kundmala Bridge Accident) काल घडली. घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरूच आहे. रविवार, 15 जून रोजी सायंकाळी साडेतीन (Heavy Rain) वाजेच्या सुमारास प्रचंड पावसांमुळे इंद्रायणी नदी ओसांडून वाहात होती. यादरम्यान नदीवर 1993 मध्ये बांधलेला, पण दीड वर्षांपूर्वीच वापरास बंद करण्यात आलेल्या कुंडमळा पूलचा एक भाग अचानक (Indrayani river) कोसळला. या पूलाचे पुनर्निर्माण 8 कोटी रुपयांच्या निधीवर सुरु आहे, पण काम पावसाळ्यामुळे (Pune News) कामास विलंब होत आहे.
रेस्क्यू ऑपरेशन
– रविवारी दुपारी 3:30 पासून रात्री 10 वाजेपर्यंत जवळपास 6.5 तास सुरु होते.
– त्यात 4 मृतदेह बाहेर काढण्यात आल्यात, तर 51 जण जखमी अवस्थेत बचावले गेलेत
– रात्री 10 वाजल्यापासून बचाव थांबला, पण आज (16 जून) सकाळी 7 वाजता पुन्हा सुरु करण्याचे नियोजन आहे.
– मात्र, मध्यरात्रीपासून अविरत सुरू असलेल्या बचावकार्याला अडथळा येण्याची शक्यता आहे.
पूलाची स्थिती आणि वैशिष्ट्ये
– 1990 मध्ये बांधकाम सुरु, 1993 मध्ये पूल पूर्ण.
– सुमारे 30 वर्षांनी दुरुस्तीची गरज उभी, त्यामुळे सध्या वापरास बंद.
– सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पूलासाठी टेंडर काढला असून कार्यादेश दिला आहे, परंतु पावसामुळे काम सुरुवात होऊ शकत नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कुंडमळा पूल दुर्घटना : प्रशासन अलर्ट, शोधकार्य सुरुच, CM फडणवीसांची माहिती; विरोधकांचा हल्लाबोल
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली जखमींची भेट
जखमींना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मंत्री यांनी गिरीश महाजन त्यांच्या प्रकृतीची रात्री उशिरा चौकशी केली. प्रत्यक्षदर्शींनाही भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून 5 लाख रूपयांची मदत, तर जखमींना संपूर्ण उपचारांचा खर्च शासन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पर्यटन करताना स्वतःची काळजी घ्या, धोकादायक ठिकाणे टाळावे,” असे आवाहन त्यांनी पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या नागरिकांना केली आहे.
गोलंदाजांना गुडन्यूज! आयसीसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’मध्येही बदल
आजच्या बचाव कार्यातील आव्हान:
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे, नदीची वाह तेकक्ष वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य अधिक महत्त्वाचे आणि जोखमीचे बनणार आहे. प्रशासनाच्या रेस्क्यू टीम, NDRF, पोलिस, अग्निशमन दलासाठी हे एक मोठे आव्हान राहणार आहे.