Download App

ललित पाटीलला धूम ठोकण्यास मदत, दोन पोलिसांना घरी पाठवलं; पोलिस आयुक्तांचा आदेश!

ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातील धूम ठोकण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने बडतर्फ करण्यात आले.

Image Credit: Letsupp

Lalit Patil Drugs Case : पुण्यातील ससून रुग्णालयात अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणारा माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) धूम ठोकण्यासाठी मदत करणाऱ्या दोन पोलिसांवर बडतर्फाची कारवाई करण्यात आलीयं. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी ही कारवाई केली असून काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं.

हाथरस प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 2 महिलांसह बाबांच्या 6 साथीदारांना अटक

पोलिस कर्मचारी आदेश शिवणकर, पिरप्पा बनसोडे अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ससून रुग्णालयातून ललित पाटीलने धूम ठोकली होती. या प्रकरणात ललित पाटीलला मदत केल्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आलायं. पोलिसांच्या चौकशीमध्ये जे कर्मचारी दोषी असल्याचं निष्पन्न झालंय त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिला असून या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय.

धनुभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचय…सकल मराठा समाजाचा कृषीमंत्री मुंडेंना थेट इशारा

ललित पाटील प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच नावे…
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते, येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे, ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३) आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (वय ३४ ), साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प) आणि त्याचा चालक दत्तात्रेय डोके (वय ४०, रा. हडपसर)

दरम्यान, ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.

follow us

वेब स्टोरीज