Download App

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं; अटकेनंतर ललित पाटीलच्या दाव्यानं खळबळ

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी तमिलनाडू येथून अटक केली आहे. त्यानंतर आता स्वतः ललित पाटील ने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळलो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजन दावा केला आहे. तसेच यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान ललित पाटील नेमकी कोणा-कोणाची नावे घेतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पाटीलने वरील खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे ललित याला ससूनमधून पळवण्यामागे कुणाचा हात आहे. यात काही राजकीय पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Pune Sasoon Hospital Drug Case Lalit Patil Big Statement After Arrest )

World Cup 2023 : नेदरलँड्सच्या विजयात ‘चिठ्ठी’चा टर्निंग पॉइंट; काय आहे खास किस्सा?

पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकमध्ये होता. एवढेच नव्हे तर, नाशिमधून इंदूर, सूरत आणि पुन्हा नाशिकमध्ये आला. तसेच त्याने नाशिक धुळे, छ. संभाजीनगर बंगळुरू असा प्रवास केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हे सर्व करत असताना त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एन्काउंटर करू नका

ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांची पाठ थोपटली जात आहे. तर, दुसरीकडे त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना दुसरीकडे याबाबत त्याच्या आई-वडिलांनी भावविक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  ललितला अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळालं आहे. मात्र त्याचं म्हणणं ऐकून घ्याव त्यानंतरच त्याच्यावर कारवाई करावी. मात्र, त्याचं एन्काऊंटर करू नये अशी भावनिक मागणी ललित पाटीलच्या पालकांनी केली आहे. सुरूवातीला आमची चौकशी झाली त्यावेळी पोलिसांना काहीही मिळालं नव्हतं असेही ललितच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Pimpri-Chinchwad : ‘ड्रीम 11’ वर टीम लावणं भोवलं; ‘करोडपती’ झालेले सोमनाथ झेंडे निलंबित

भावानंतर पोलिसांना आवळल्या ललितच्या मुसक्य

काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी फरार झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले होते.

ललित पाटील हा चेन्नईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. यानंतर आता त्याला पुण्यात आणलं जाणार आहे. येथे न्यायालयात हजर केले जाईल. याआधी आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. यानंतर आता पोलिसांनी ललित पाटीललाही जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलीस आणखी तपास करतील. त्यामुळे आता तो आणखी कुणाची नावे घेतो, चौकशीतून काय माहिती हाती येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us