Download App

शरद मोहोळच्या हत्येची माहिती वकिलांना आधीच, पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा

  • Written By: Last Updated:

Sharad Mohol Murder case : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. आता त्याच्या हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना खुनाची आधीच माहिती होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे (Sunil Tambe) यांनी ही माहिती न्यायालयाला दिली. शरद मोहोळ खून प्रकरणात अॅड. रवींद्र पवार (Ravindra Pawar) आणि अॅड. संजय उढाण यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Pune Metro : कासारवाडी रेल्वे स्टेशनवर स्पार्किंग ब्लास्ट, मेट्रोची एक मार्गिका बंद

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहोळ याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र आरोपींना यश आले नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. अॅड. उढाण याचे या हत्याकांडातील आरोपीशी खून करण्यापूर्वी बोलणं झालं होतं असं पोलिसांच्या तपासतात समोर आलं.

अॅड. रवींद्र पवार आणि अॅड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह धनंजय मारुती व्हटकर व सतीश संजय शेडगे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी तांबे यांनी कोर्टाला महत्वाची माहिती दिली. शरद मोहोळ यांच्या हत्येसाठी आरोपी धनंजय व्हटकर आणि सतीश शेडगे यांनी शस्त्रे मागवली होती. ही शस्त्रे त्यांनी मध्य प्रदेशातून आणली होती. त्यांना शस्त्रे देणाऱ्यांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी एकूण चार शस्त्रे मागवली असून त्यापैकी तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय त्यांना आणखी काही शस्त्रे पुरवली होती का? याचाही पोलीस शोध घेत असल्याचे सुनील तांबे यांनी सांगितले.

राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र 

शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. आरोपींनी जुने सिमकार्ड काढून नवीन सिमकार्ड वापरून एका व्यक्तीला फोन केला होता. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांना आहे.

मुन्ना पोळकर आणि त्याचा मामा नामदेव कानुगडे हे अनेक दिवसांपासून शरद मोहोळला मारण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. यानंतर आरोपी सतत संधी शोधत होते. अखेर 5 जानेवारी रोजी त्याने शरद मोहोळचा खून केला, असं पोलिसांनी सांगितलं.

 

follow us