Video : लक्ष्मण हाकेंनी मद्यपान करून शिविगाळ केली; मराठा तरुणांचा आरोप

टिळेकर नगर परिसरात टेकडीवर बियर पिऊन धिंगाणा सुरू होता.लक्ष्मण हाके व साथीदारांनी दोन महिन्यात तुम्हाला मर्डर करुन संपवतो अशी धमकी दिली.

Laxman Hake

Laxman Hake

Laxman Hake: ओबीसी (OBC) आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा समाजातील तरुण यांच्यामध्ये पुण्यात वाद झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी मद्यपान करून शिविगाळ केला असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यावेळी लक्ष्मण हाकेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आले आहे. लक्ष्मण हाकेंना घेऊन तरुण हे कोंढवा पोलिस स्टेशनला गेले आहेत. पण हाके यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी मद्य चाचणी करण्याची तयारी दाखविली आहे.

राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विधानसभेचे रणशिंग कोल्हापुरातून फुंकणार

टिळेकर नगर परिसरात टेकडीवर बियर पिऊन धिंगाणा सुरू होता.लक्ष्मण हाके व साथीदारांनी दोन महिन्यात तुम्हाला मर्डर करुन संपवतो अशी धमकी दिली. सार्वजनिक ठिकाणी आम्हाला धमकी दिली. मराठ्यांनो, मला हात लावा असा अविर्भाव हाके करत होता,असा आरोप मराठा तरुणांनी केला आहे. हा प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. लक्ष्मण हाके दारु पिऊन मराठा युवकांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली.

Maratha Reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल, मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर…

याबाबत मराठा तरुणांनी हाके यांना जाब विचारला आहे. काही जण हाके यांना घेऊन पोलिस स्टेशनला गेले आहे. हाके यांची मेडीकल चेकॲप करण्याची तरुणांनी मागणी केली आहेत. गेल्या आठवड्यात लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात गरळ ओकली होती.

हाके यांचे म्हणणे काय ?

लक्ष्मण हाके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी काही जणांनी मला अडविले. नंतर मानगुटाला धरून माझा व्हिडिओ केला आहे. दोन तरुण माझा पाळतीवर होते. मी कुठेही मद्य सेवन केलेले नाही. मद्य सेवन केल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावेत. मी मद्य चाचणी करण्यास तयार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे.

Exit mobile version