मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या पाठोपाठ लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित…
Laxman Hake : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आज (दि. 25 सप्टेंबरला) आपले उपोषण सोडल्यानंतर धनगर आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनीही उपोषण सोडलं आहे. वडीगोद्री येथे ओबीसी महिला आणि मुलींच्या हाताने पाणी घेऊन हाकेंनी उपोषण सोडलं. उपोषणाच्या 7 व्या दिवशी हाकेंनी उपोषण सोडले.
जरांगेंच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष? ‘रोज मरे त्याला कोण रडे’; भुजबळांचा खोचक टोला
जरांगेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवली सराटी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील अंतरवली सराटीपासूनच जवळच असलेल्या वडगोद्रीत उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी हक्काच्या संरक्षणालसाठी हाकेंनी वडीगोद्री येथे उपोषणाला सुरूवात केली होती. हाके यांनी यांनी उपोषण सुरूवात केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अनेक नेत्यांकडून त्यांनी उपोषण सोडावं, यासाठी प्रयत्न केले होते.
अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील…; आमदार बच्चू कडूंचे मोठे विधान
दरम्यान, हाके आणि वाघमारे याच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं. यावेळी अंतरवली सराटीतून शेकडो महिला हाके यांच्या भेटीला आल्या होता.
उपोषण सोडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके म्हणाले, वडीग्रोदी परिसरात झुंडशाहीने हैदोस घातला होता. तो थांबवणे कुणालाही जमलं नाही. मात्र, ते आमच्या उपोषमाने करून दाखवलं. हैदराबाद गॅझेटचा मंत्रिमंडळाचा निर्णय रोखण्यात आम्हाला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा हैदराबाद गॅझेटच्याा निर्णयाबद्दल प्रयत्न केला तर पुन्हा आंदोलन उभारू, असा इशारा हाकेंनी दिला.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण गेल्या 7 दिवसांपासून सुरू होतं. मात्र, आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. आता पुढील उपचारासाठी त्यांना जालन्याला रवाना करण्यात आलं.