जरांगेंच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष? ‘रोज मरे त्याला कोण रडे’; भुजबळांचा खोचक टोला
Chagan Bhujbal On Manoj Jarange : रोज मरे त्याला कोण रडे, मनोज जरांगे सारखेच उपोषण करतात सरकारला तेवढचं काम आहे का? असा खोचक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना लगावलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. अंतरवली सराटीत त्यांनी हे उपोषण सुरु केलं होतं. अखेर न्यायालयाची विनंती आणि समाजबांधवांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिला असून उपोषण स्थगित केलंय. यावरुन छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते.
Swargate Metro: आरारा… खतरनाक… अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्थानकाचे मनमोहक फोटो व्हायरल
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा काही लोकांना थोड्याफार प्रमाणात फायदा झालायं. मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलंय, त्यामुळे आता मराठा समाज आंदोलनापासून वेगळा झालायं. प्रत्येक पक्षात मराठा समाज, मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे कोण कोणाला विरोध करणार? असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत. आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो. त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परिक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठ दु:ख होतं. त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई-बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.
अर्थखात्याचा विरोध तरीही बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड कवडीमोल दरात; काय आहे प्रकरण?
ओबीसीतून आरक्षण देणार हे पवार-ठाकरेंकडून लिहून घ्या…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मनोज जरांगे यांनी लिहून घ्यावे आणि त्यांना मदत करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षण प्रश्नी सर्व पक्षीय बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांचीही स्वाक्षरी असल्याचा कागद सरकारकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. ते खोटे कथन करतात. त्यांनी केलेल्या खोट्या नेरेटिव्हला भाजपचे कार्यकर्ते उत्तर देत नाहीत. 1982 साली मराठा आरक्षण प्रश्न बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची मागणी कॉग्रेस आणि शरद पवार यांनी कधी पूर्ण केली नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ही मागणी भाजपने पूर्ण केली.