Download App

जीव वाचवणारी शस्त्रक्रिया जीवावर बेतली; लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; पुण्यातील नामांकित रूग्णालयावर प्रश्नचिन्ह

Sahyadri Hospital मध्ये एका लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Life-saving surgery ends in death; Husband and wife die after liver transplant; Shocking incident in Pune Sahyadri Hospital : अनेकदा आपल्या जीवलगांचा जीव वाचण्यासाठी अनेक जण अवयव दान करतात. यामध्ये विषेशत: किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र अशाच एका लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील एका प्रसिद्ध रूग्णालयात घडली आहे. या मृतांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर यांना गंभीर आजार होता. त्यामुळे त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांनी त्यांना स्वतःचे लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या आठवड्यात बुधवारी शस्त्रक्रिया पार पडली.

उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांच्यानंतर महाराष्ट्रातून आणखी एक अर्ज! आश्चर्याचा धक्का देणारा उमेदवार कोण?

मात्र शस्त्रक्रिया करून देखील काहीही उपयोग झाला नाही. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसातच म्हणजे शुक्रवारी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. तर ही घटना ताजी असतानाच बरोबर आठ दिवसांनी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी केलेली ही शस्त्रक्रिया या दोघांच्या जीवावर बेतली आहे. या घटनेनंतर कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटल आणि येथील डॉक्टरांवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Video : चमोलीत ढगफुटीने हाहाकार! दोघेजण दबले, अनेक घरे ढिगाऱ्याखाली; शेकडो बेपत्ता

दुसरीकडे या घटनेमुळे पुण्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कारण सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांसाठी ओळखलं जातं. देशातील नामांकित रुग्णालयांपैकी ते एक आहे. मात्र या घटनेमुळे येथील उपचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

follow us