उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांच्यानंतर महाराष्ट्रातून आणखी एक अर्ज! आश्चर्याचा धक्का देणारा उमेदवार कोण?

उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांच्यानंतर महाराष्ट्रातून आणखी एक अर्ज! आश्चर्याचा धक्का देणारा उमेदवार कोण?

After CP Radhakrishnan, another application from Maharashtra for the post of Vice President Who is the surprising candidate : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची तर विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र हे दोनच उमेदवार ही निवडणूक लढवणार नाही, तर यामध्ये एका तरुणाने अर्ज दाखल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Video : चमोलीत ढगफुटीने हाहाकार! दोघेजण दबले, अनेक घरे ढिगाऱ्याखाली; शेकडो बेपत्ता

विशेष म्हणजे हजारो पुण्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर या गावातील आहे. उमेश म्हेत्रे असे या तरुणाचे नाव आहे. दिल्लीतील राज्यसभेच्या उदाहरणात निवडणूक निर्णय अधिकारी पीसी मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्याने आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उमेदवारीसाठी लागणार 15000 रुपयांचे डिपॉझिट आहे. त्याने जमा केलं आहे. या तरुणाच्या या धाडसी पावलामुळे राजकीय आणि स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलं आहे.

दोन गटांत तुफान दगडफेक पीएसआयसह 8 नागरिक जखमी; कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

दरम्यान या तरुणाने दाखल केलेला अर्ज हा सर्वसामान्यांमधील तसेच तरुणांमधील आत्मविश्वास आणि जिद्दीचा दर्शन घडवणार ठरला आहे. कारण भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराला वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीस प्रस्तावक तसेच वीस अनुमोदकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. उमेशने या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला.

अर्र..अचानक बदलली फोन कॉल अन् डायलर स्क्रिन; घाबरू नका, नवीन अपडेट ओळखा डिलीटही करा

त्यामुळे एकीकडे देशातील दोन दिग्गज आघाड्या आणि दुसरीकडे हा सर्वसामान्य तरुण यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या या तरुणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता निवडणूक आयोगाकडून त्याच्या अर्जाची छाननी होईल आणि हा अर्ज वैध ठरल्यास तो निवडणुकीत काय प्रभाव पडतो? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. त्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube