दोन गटांत तुफान दगडफेक पीएसआयसह 8 नागरिक जखमी; कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

दोन गटांत तुफान दगडफेक पीएसआयसह 8 नागरिक जखमी; कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

Two groups clashed in stone-pelting, 8 civilians including PSI injured; What exactly happened in Kolhapur : कोल्हापूर शहरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे या वादामध्ये काही हल्लेखोरांनी विजेच्या तारांवर देखील हल्ला केला त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तर अंधारामध्ये सुरूच असलेल्या या दगडफेकीमध्ये हल्ल्याचा अंदाज येत नसल्याने महिला आणि मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत तरुण पोलिसांना हा जमा पांगवताना अथक प्रयत्न करावे लागले.

नेमकी घटना काय?

कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात एका गटाकडून शुक्रवारी वर्धापन दिनानिमित्त डीजे आणि फलक लावण्यात येत होते. मात्र यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद दिवसभर सुरू होता. मात्र सायंकाळी या वादाचं रूपांतर तुफान दगडफेक वाहनांची तोडफोड यामध्ये झालं.

अर्र..अचानक बदलली फोन कॉल अन् डायलर स्क्रिन; घाबरू नका, नवीन अपडेट ओळखा डिलीटही करा

या घटनेची माहिती मिळताच सिद्धार्थ नगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये अनेकांवर दगडफेक करण्यात आलेले जखमी झाले आहेत तसेच आठ ते दहा वाहनांचे नुकसान झालं असून एका वाहनाला आग देखील लागली आहे. या घटनेमध्ये पीएसआय शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत. त्या जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कबूतखान्याबाबतीत मोठी अपडेट, 13 सदस्यांची समिती गठीत; कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार

या जखमींमध्ये पीएसआय शेष मोरे तसेच अंमलदार आबिद मुल्ला तसेच नागरिकांमध्ये परहाज नायकवडी, निहाल शेख, सद्दाम महात, अश्फाक नायकवडी, इकबाल सरकवा यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटामधील 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठी मार देखील करावा लागला. या घटनेनंतर या घटनास्थळी दगडांचा आणि काचांचा अक्षरशः ठीक पडला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube