कबूतखान्याबाबतीत मोठी अपडेट, 13 सदस्यांची समिती गठीत; कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार

कबूतखान्याबाबतीत मोठी अपडेट, 13 सदस्यांची समिती गठीत; कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार

Dadar Kabutar Khana Mumbai : दादर येथील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला (Dadar Kabutar Khana) होता. कबूतरखाना बंद करण्याचे (Mumbai High Court) आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. कबूतरांच्या विष्ठेमुळे माणसांना आजारांचा धोका निर्माण होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. आता या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबूतरांचा परिणाम तपासण्यासाठी 13 जणांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालायाने 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. आता या समितीने कामकाजास सुरुवात करणार आहे. पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित आहे. या समितीत सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, पशुवैद्यकीय, विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, फुप्फुसतज्ज्ञांच समावेश आहे.

“Dadar Kabutar Khana आंदोलन चुकीचंच, बाहेरच्या लोकांनी..”, मंत्री लोढांनी स्पष्टचं सांगितलं

समितीत कोणाची नियुक्ती

सार्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक विजय कंदेवाड या समितीचे अध्यक्ष आहेत. नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे सहसचिव आहेत. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे किशोर रिठे, एम्स नागपूरचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे सचिव डॉ. एसके दत्ता, फुप्फुसरोग तज्ज्ञ डॉ. सुजित रंजन व डॉ. अमिता आठवले, रोगप्रतिकारशक्ती तज्ज्ञ डॉ. मनिषा मडकईकर, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आरजे झेंडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. शिल्पा पाटील आणि मुंबई महापालिका आरोग्य अधिकारी दक्षा शाह या समितीत सदस्य आहेत.

समिती नेमकं काय करणार

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दिल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास समिती करणार आहे. कबुतरांच्या विष्ठेचा माणसांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो तसेच कबुतरांना नियंत्रित पद्धतीने अन्न देण्याची शक्यता आणि त्याचे परिणाम या गोष्टींचा समिती अभ्यास करणार आहे. या संबंधित एक नियमावली समिती तयार करील. याचिकाकर्त्यांकडून मिळालेल्या निवेदनांचा अभ्यास करण्याचेही काम समिती करणार आहे.

ब्रेकिंग! कबुतरखाना बंदीविरोधात जैन समाजाचं तीव्र आंदोलन; परिसरात तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप

संपूर्ण प्रकरण काय?

2 ऑगस्टच्या रात्री बीएमसीने दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना संकुल पूर्णपणे प्लास्टिकच्या चादरी आणि बांबूच्या बांधकामांनी झाकले. जेणेकरून लोक तिथे अन्न टाकू शकणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यास बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. कोणीही आदेशाचे उल्लंघन करू नये म्हणून तेथे नियमित देखरेख केली जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube