Video : चमोलीत ढगफुटीने हाहाकार! दोघेजण दबले, अनेक घरे ढिगाऱ्याखाली; शेकडो बेपत्ता

Video : चमोलीत ढगफुटीने हाहाकार! दोघेजण दबले, अनेक घरे ढिगाऱ्याखाली; शेकडो बेपत्ता

Chamoli Cloudburst : उत्तर भारतात पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. ढगफुटीच्या घटना सातत्याने (Chamoli Cloudburst) घडत आहेत. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) राज्यातील किश्तवाड, कठुआनंतर आता उत्तराखंड राज्यात (Uttarakhand News) ढगफुटीची घटना घडली आहे. येथील चमोलीत ढगफुटीने हाहाकार उडाला आहे. चमोलीतील थरालीत ढगफुटी झाली. या घटनेत दोघेजण दबल्याची माहिती आहे. तसेच अनेक घरे सुद्धा ढिगाऱ्याखली दबली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रशासनाची पथके येथे दाखल झाली आहेत. लोकांची मदत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की थराली तहसील हद्दीत काल रात्री ढगफुटी होऊन मोठे नुकसान झाल्याची शंका आहे. ढगफुटी झाल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. एसडएम यांच्या घरात तर चार फूट कचरा जमा झाला आहे. चमोलीचे एडीएम विवेक प्रकाश यांनी सांगितले की या घटनेत मोठे नुकसान झाले आहे. एक वीस वर्षीय मुलगी आणि एक वयोवृद्ध व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या दोघांचा शोध घेतला जात आहे. थराली आणि आसपासच्या भागात अतिमुसळधार पाऊस झाल्याने कचरा तयार झाला आहे.

Kishtwar : किश्तवाड ढगफुटीत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, 200 बेपत्ता

चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थराली भागात अतिवृ्ष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी रात्रीच येथील नागरिकांना सतर्क केले होते. तसेच या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितले की चमोली जिल्ह्यातील थरालीत ढगफुटी झाल्याने लोकांची घरे, बाजार आणि एसडीएम आवास येथे कचरा साचला. जिल्हा मॅजिस्ट्रेट आणि मदत पथक तत्काळ येथे दाखल झाले.

मु्ख्यमंत्री धामी यांनी प्रशासनकडून या घटनेचा आढावा घेतला. संबंधित यंत्रणांना लोकांची मदत करण्याचे तसेच परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. मी स्थानिक प्रशासनाच्य संपर्कात आहे. परिस्थितीचा आढावा घेत आहे. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, पोलीस मदतकार्यात गुंतलेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री धामी यांनी सोशल मीडियावरून दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube