Download App

मद्यविक्रीवर बंद, मेट्रो सेवेत वाढ… विसर्जनासाठी पार्किंगची सोय ; पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

  • Written By: Last Updated:

Ganesha Immersion In Pune : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात यंदा गणेशोत्सव (Ganesha Immersion) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग दिसत असून, प्रशासनाने गर्दी नियंत्रणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (Pune) आणि सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात वाहतुकीची व्यवस्था, मेट्रो सेवा (Metro Service), पार्किंगची सुविधा, ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि मद्यविक्रीवरील निर्बंधांचा (Liquor Sale Ban) समावेश आहे.

राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी

मेट्रो प्रवाशांची विक्रमी वाढ

गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 30 ऑगस्ट रोजी एका दिवसात तब्बल 3 लाख 68 हजार 516 प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. मागील दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास 1 लाखाने जास्त होती. प्रवासी वाढल्याने मेट्रोचे उत्पन्नही 13 लाख रुपयांनी वाढले आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी गणेशोत्सवादरम्यान मेट्रोची सेवा रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली असून, यामुळे भाविकांना मोठी सोय झाली आहे.

Breaking : 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप! दिल्ली हादरली, अफगाणिस्तानात मृतांचा आकडा 9 वर

विसर्जनावेळी पार्किंगची खास व्यवस्था

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही समस्या टाळण्यासाठी वाहतूक विभागाने २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

दुचाकींसाठी पार्किंग:

– न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
– शिवाजी आखाडा वाहनतळ
– देसाई कॉलेज – पोलिस पार्किंग
– विमलाबाई गरवारे हायस्कूल
– गोगटे प्रशाला
– आपटे प्रशाला
– मराठवाडा कॉलेज
– पेशवा पथ, रानडे पथ
– पेशवे पार्क, सारसबाग
– हरजीवन रुग्णालय, सावरकर चौक
– काँग्रेस भवन रस्ता
– पाटील प्लाझा पार्किंग
– पर्वती–दांडेकर पूल, गणेशमळा परिसर

चारचाकींसाठी पार्किंग:

– निलायम टॉकीज
– हमालवाडा, पत्र्यामारुती चौक
– आबासाहेब गरवारे कॉलेज
– संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान
– फर्ग्युसन कॉलेज
– एसएसपीएमएस, शिवाजीनगर
– जैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता
– एसपी कॉलेज
– पीएमपीएमएल मैदान, पुरम चौक
– न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता
– नदी पात्र भिडे ते गाडीतळ पूल परिसर

मद्यविक्रीवर पूर्ण बंदी

शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 2 सप्टेंबर (गौरी विसर्जन) आणि 6 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी पुण्यात मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवली जाईल. तसेच विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुकाने आणि आस्थापनेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत घेण्यात आला आहे.

ध्वनीप्रदूषण नियंत्रणातील बदल

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरासाठी आधी 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत शिथिलीकरण देण्यात आले होते. मात्र त्यात सुधारणा करून 1 सप्टेंबरऐवजी 5 सप्टेंबर (दहावा दिवस) हा दिवस वापरासाठी मंजूर करण्यात आला आहे. हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी, पुणे यांनी जारी केला आहे. पुण्यातील गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे. मेट्रोची वाढीव सेवा, विसर्जनासाठी विशेष पार्किंग, मद्यबंदी आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण या उपाययोजनांमुळे भाविकांना अधिक सोय होणार असून उत्सवाचा आनंद अधिक उत्साहात घेता येणार आहे.

 

follow us