Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांचे इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते. त्यात आता वर्ध्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या शिकवण्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने वेगळा ठसा उमटवणारे निलेश कराळे गुरुजी ( Nilesh Karale ) शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी आले होते.
आमिर खान पहिल्यांदाच कॉमेडियनसोबत करणार स्क्रीन शेअर; ‘या’ शोमध्ये दिसणार एकत्र
त्यामुळे वर्ध्यातून शरद पवार गटाकडून कराळे गुरुजींना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले त्यावर स्वतः कराळे गुरुजी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कराळे गुरुजी म्हणाले की, मी लहानपणापासून शरद पवारांना पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद असल्यास मला वर्धा लोकसभेची जागा मिळेल. तसेच माझ्याबद्दल शरद पवार आणि जयंत पाटील हे नेहमीच सकारात्मक राहिले आहे.
‘त्या’ प्रस्तावात बदल शक्य चर्चा करू, ‘वंचित’ने सोबत यावे एवढीच भूमिका : संजय राऊत
त्यामुळे येणाऱ्या काळात ते मला संधी देतील. तसेच ही बातमी वर्धा मध्ये करतात तेथील महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सर्वच कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. मी प्रचंड मताने विजयी होऊ शकतो. हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो.
मुंडेंच्या तोडीचा नेता शरद पवारांच्या गळाला… बजरंग सोनवणेंचा अजितदादांच्या गटाला राम-राम
महाविकास आघाडी मधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. कारण असंविधनिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत. एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावी असं त्यांचं मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे, संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आता सांगता येणार नाही. असं म्हणत कराळे गुरूजी यांनी आपल्याला उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले आहे.
तर वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपच्या रामदास तडस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. गेल्यावेळी देखील ते याच मतदारसंघातून खासदार होते. त्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. यावेळी त्यांचा विजय झाल्यास त्यांच्या खासदारकीची हॅट्रिक होणार आहे. त्यामुळे आता वर्ध्यामध्ये भाजपचे तडस आणि राष्ट्रवादीचे कराळे गुरुजी यांच्यात लढत होणार काही पाहणं उत्सुकतेच राहणार आहे.