आमिर खान पहिल्यांदाच कॉमेडियनसोबत करणार स्क्रीन शेअर; ‘या’ शोमध्ये दिसणार एकत्र

आमिर खान पहिल्यांदाच कॉमेडियनसोबत करणार स्क्रीन शेअर; ‘या’ शोमध्ये दिसणार एकत्र

The Great Indian Kapil Show: कॉमेडीचा किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा त्याचा कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) घेऊन येत आहे. या शोबद्दल चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. सुनील ग्रोव्हरही बऱ्याच दिवसांनी कपिलच्या शोमध्ये कमबॅक करत आहे. (Aamir Khan) शिवाय शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि अर्चुना पूरनसिंग यांचाही समावेश आहे. आता एक अपडेट समोर आले आहे की, आमिर खानही या शोमध्ये दिसणार आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आमिर खान दिसणार

कपिल शर्माच्या शोच्या कोणत्याही सीझनमध्ये आमिर खान (Aamir Khan) दिसला नाही. आता ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कपिल आमिर खानसोबत मस्ती करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका सूत्राने सांगितले की, ‘आमिर खान कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा कधीच भाग झाला नाही, पण ही पहिलीच वेळ असेल जेव्हा तुम्ही त्याला कपिल शर्माच्या शोमध्ये पहाल.’ आता ही माहिती किती खरी आहे हे शो स्ट्रीम झाल्यानंतरच समजणार आहे.

कपिल आणि सुनील 7 वर्षांनंतर एकत्र

या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर तब्बल 7 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी सुनील ‘द कपिल शर्मा’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ सारख्या सीझनमध्ये गुत्थी आणि डॉक्टर मशूर गुलाटीच्या भूमिकेत कपिलसोबत दिसला आहे. सुनीलच्या या व्यक्तिरेखांना चाहत्यांनी सर्वाधिक पसंत केले. पण 2017 मध्ये सुनील ग्रोवरचे कपिल शर्मासोबत काही मतभेद झाले होते, त्यानंतर अभिनेताने शो सोडला होता.

रवी किशनचा ‘महादेव का गोरखपूर’ रचणार इतिहास; 5 भाषा, 150 पेक्षा जास्त स्क्रीन आणि अमेरिकेत होणार रिलीज

कपिल शर्माचा शो कोणत्या दिवशी होणार?

आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि आता दोघेही चाहत्यांना हास्याचा पूर्ण डोस देण्यासाठी परत येत आहेत. कपिल शर्माचा हा शो टीव्हीऐवजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होणार आहे. हा शो 30 मार्चपासून प्रसारित होणार आहे. एकीकडे सुनील ग्रोव्हरने शोमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सुमोना चक्रवर्ती आणि चंदू या सीझनमधून गायब आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज