रवी किशनचा ‘महादेव का गोरखपूर’ रचणार इतिहास; 5 भाषा, 150 पेक्षा जास्त स्क्रीन आणि अमेरिकेत होणार रिलीज

रवी किशनचा ‘महादेव का गोरखपूर’ रचणार इतिहास; 5 भाषा, 150 पेक्षा जास्त स्क्रीन आणि अमेरिकेत होणार रिलीज

Mahadev Ka Gorakhpur: अभिनेता आणि खासदार रवी किशन (Ravi Kishan) लोकसभा निवडणुकीपूर्वी इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘महादेव का गोरखपूर’ हा (Mahadev Ka Gorakhpur Movie) पहिला भोजपुरी चित्रपट असेल जो संपूर्ण देशात 150 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतातच नाही तर अमेरिकेतही प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. निर्माते हा चित्रपट अमेरिकेतील 12 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हा पॅन इंडिया भोजपुरी चित्रपट 29 मार्च रोजी अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. उत्तर प्रदेशातील 52, बिहारमधील 72 आणि बंगाल आणि आसाममधील 23 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिनेप्लेक्स आणि आयनॉक्सवरही प्रदर्शित होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट प्रदर्शित झाल्याने रवी किशन खूप खूश आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

कसा आहे टीझर?

सुमारे दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये रवी किशनला महादेवाचा एक भाग दाखवण्यात आला आहे. टीझरमध्ये रवी किशन खूप ॲक्शन करताना दिसला. रवी किशन व्यतिरिक्त या चित्रपटात प्रमोद पाठक आणि इंदू थंपी सारखे हटके कलाकार देखील दिसणार आहेत.

Singham Again : सिंघम अगेनच्या शूटिंगसाठी रोहित- करीना कपूर पोहोचले वाईच्या 262 वर्षे जुन्या मंदिरात

‘महादेव का गोरखपूर’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मोहन यांनी केले आहे. असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट एक उच्च बजेट पिक्चर आहे, जो मोठ्या प्रमाणावर बनवला गेला आहे. या चित्रपटाचे शूटिंग गोरखपूर आणि आसपासच्या भागातच झाले आहे. हा चित्रपट भोजपुरीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रितेश शाह आणि सलील शंकरन यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.

‘महादेव का गोरखपूर’ची निर्मिती वाया फिल्म्सने रवी किशन प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. त्याची कथा साई नारायण यांनी लिहिली आहे. आगम अग्रवाल आणि रंजिन राज यांनी संगीत दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube