Ex mla Bapu Pathare Will Join Sharad Pawar NCP: विधानसभेसाठी (Assembly Election 2024) इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाचा गणेशोत्सवाच्या माहोलमध्ये इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे. पुण्यात तर माजी आमदार बापू पठारे यांनी एका मंडळाला भेट देताना थेट आपली उमेदवारी जाहीर करून टाकले आहे. सध्या भाजपमध्ये असलेले बापू पठारे (Ex mla Bapu Pathare) यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये (NCP) जाणार असल्याचे थेट जाहीर केले. त्याचबरोबर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही पठारे यांनी क्लिअर केले आहे. त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे. बापू पठारे यांनी राजकीय दिशा स्पष्ट केल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.
Swiggy मध्ये तब्बल 33 कोटींचा घोटाळा, माजी कर्मचाऱ्यावर आरोप
गेल्या काही दिवसांपासून बापू पठारे हे भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतील, अशी जोरदार चर्चा होती. तशा राजकीय हालचाली सुरू होत्या. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी पठारे यांची भेट घेतली होती. परंतु पठारे यांनी थेटपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊ असे जाहीर केले. नव्हते. परंतु आता पठारे यांनी एका गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर थेट राजकीय भूमिका जाहीर केलीय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून, मी जाहीर करतो मी निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे, असे बापू पठारे यांनी म्हटले आहे.
किती वेळा नवरे बदलले तू अन् कुणाला बोलतो?, चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देतांना खडसेंची जीभ घसरली
भाजपला धक्का! महायुतीमध्येच कुरबुरी
दुसरीकडे महायुतीमध्ये सध्या बिघाडी झालीय. पुण्यात भाजपचे कार्यकर्ते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात आक्रमक आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडून वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अन्यथा दुसऱ्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत आहे. अजित पवार गटाचे
वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोर्शे अपघात प्रकरणात टीकाला सामोरे जावे लागले होते. तर महाविकास आघाडीकडून थेट टिंगरे यांच्यावर आरोप झाले होते. टिंगरे यांची याप्रकरणात पोलिस चौकशी झाली होती. तर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवार गट व भाजपमध्ये काहीच जुळत नाही हे दिसून येत आहे.
बापू पठारे मुळचे राष्ट्रवादीचे
बापू पठारे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आहे. त्यांनी महानगरपालिका स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. तर 2009 ला वडगाव शेरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले होते. परंतु 2014 ला भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला. पण 2019 ला पठारे यांना तिकीट मिळाले नाही. अजित पवार यांचे जवळचे असलेले सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाले होते. त्यामुळे नाराज झालेले पठारे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही टिंगरे हे विजयी झाले आहेत. पण विधानसभेला शरद पवार गटाकडून संधी मिळणार असल्याने बापू पठारे यांनी भाजपची साथ सोडली आहे.